top of page

अंगकोरवाट कंबोडिया हेरिटेज यात्रा

०२ – १० डिसेंबर २०२६ | ९ दिवस · ८ रात्री

यात्रा शुल्क: ₹ १,४८,०००/-
विशेष यात्रा शुल्क: ₹ १,४०,०००/-
(१५ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदणी करणाऱ्यांसाठी लागू)

पॅकेजमध्ये समाविष्ट: दोन्ही बाजूंची विमान तिकिटे • व्हिसा • प्रवास विमा • पंचतारांकित हॉटेलमधील निवास • भोजन • स्थानिक प्रवास व्यवस्था • प्रेक्षणीय स्थळे व मंदिर प्रवेश शुल्क • तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हेरिटेज स्थळदर्शन

नोंदणीसाठी आगाऊ रक्कम: ₹९०,०००/- प्रति व्यक्ती
मर्यादित जागा उपलब्ध

यात्रेची ठळक वैशिष्ट्ये

आशीर्वाद

प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या दिव्य आशीर्वादाने संपन्न होणारी यात्रा.

विश्वासार्ह
हेरिटेज यात्रा

२१ यशस्वी यात्रांमधील १,२०० हून अधिक यात्रेकरूंचा अनुभव आणि विश्वास.

वैशिष्ट्यपूर्ण
वारसा स्थळे

अंगकोरवाट तसेच कंबोडियातील इतर महत्त्वपूर्ण मंदिरे, स्मारके आणि सांस्कृतिक वारसा स्थळांचा अनुभव घ्या.

उत्कृष्ट निवास
आणि आदरातिथ्य

आरामदायी पंचतारांकित निवास, शुद्ध शाकाहारी भोजन आणि सुनियोजित स्थानिक प्रवास व्यवस्था.

मार्गदर्शित सांस्कृतिक अनुभव

कंबोडियाचा इतिहास, मंदिरे, परंपरा आणि भारत-कंबोडिया यांच्यातील सभ्यतामूलक संबंधांविषयी सखोल आणि अर्थपूर्ण माहिती.

सुनियोजित
सर्वसमावेशक यात्रा

विमान प्रवास, व्हिसा, विमा, निवास, भोजन, स्थानिक प्रवास व्यवस्था, प्रेक्षणीय स्थळे आणि मंदिर दर्शन यांचे सुनियोजित व्यवस्थापन.

प्रख्यात लेखक आणि भीष्म सनातन वैदिक हिंदू युनिव्हर्सिटी, अमेरिकाचे संचालक प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या ओजस्वी वाणीतून आपण जेव्हा गेल्या दोन हजार वर्षांच्या प्राचीन कंबुज देशाचा (सध्याचा कंबोडिया) इतिहास ऐकतो, त्याच्या परंपरा, संस्कृती आणि समृद्ध सभ्यता यांचा परिचय करून घेतो, तेव्हा हृदयात रोमांच दाटून येतो आणि अभिमानाने उर भरून येतो. प्राचीन भारतीय हिंदू आणि बौद्ध राजांनी कंबोडियामध्ये निर्माण केलेली राज्यव्यवस्था, त्यांची साम्राज्ये, त्यांनी उभारलेली भव्य मंदिरे, अद्वितीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, देवराज सारख्या अद्भुत परंपरा, प्राचीन विद्यापीठे, नागदेवता आणि अप्सरांच्या पौराणिक कथा — या सर्वांमधून आपण भारताच्या भव्य इतिहासाचा विस्तार अनुभवतो. जणू आपला एखादा पूर्वजन्म कंबुज देशात झाला होता आणि त्या दिव्य भूमीशी आपला एक आत्मीय बंध आहे अशी अनुभूति प्रत्येकाला येते. 

यात्रा तपशील:

  • ​​​यात्रा कालावधी: ०२–१० डिसेंबर २०२६ 

  • भारतातील यात्रेकरूंसाठी: ₹1,48,000/- प्रति व्यक्ती (विमान प्रवास, व्हिसा, इन्शुरन्स आणि सर्व खर्चासह)

  • १५ सप्टेंबरपर्यंत सवलतीत ₹1,40,000/-

  • ​दांपत्य सवलत: ₹2,000/- प्रति व्यक्ती

  • ग्रुप सवलत (4+ persons): ₹3,000/- प्रति व्यक्ती

WhatsApp Image 2025-08-28 at 17.27.04_7d8cf784.jpg

दिवसनिहाय यात्रा नियोजन
०२–१० डिसेंबर २०२६ | ९ दिवस · ८ रात्री

दिवस ०१

प्राचीन भारतीय संस्कृती आणि स्थापत्यकलेचा नव्याने परिचय करून देणाऱ्या अविस्मरणीय यात्रेची सुरुवात...

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून प्रस्थान

अंगकोरवाट

अंगकोरवाट विष्णुधाम

टोनले सॅप

टोनले सॅप

ता प्रोम मंदिर

ता प्रोम आणि प्रीह खा

अप्सरा नृत्य

अप्सरा नृत्य

बायोन

अंगकोर थॉम आणि बायोन

बांटी श्री मंदिर

बांटी श्री

कबाल स्पीयान

कबाल स्पीयान

अंगकोरवाट मंदिर दर्शन

पॅकेज तपशील :

भारतातील यात्रेकरूंसाठी: ₹१,४८,०००/-
विशेष यात्रा शुल्क: ₹१,४०,०००/- प्रति व्यक्ती (विमान प्रवास, व्हिसा, विमा आणि यात्रेतील सर्व खर्चांसह)

(१५ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदणी करणाऱ्यांसाठी लागू)

सियाम रीप येथे थेट यात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंसाठी: ₹८५,०००/- प्रति व्यक्ती

भारताबाहेरून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी: US$ १,००० (यात्रेतील सर्व स्थानिक खर्चांसह) + ई-व्हिसा + विमान प्रवास खर्च

✅ पासपोर्टची किमान वैधता १८० दिवस असणे आवश्यक आहे.

दाम्पत्य सवलत: प्रति व्यक्ती ₹२,०००/- सवलत
✅ ग्रुप सवलत (४ किंवा अधिक व्यक्ती): प्रति व्यक्ती ₹३,०००/- सवलत

✅ नोंदणीसाठी आगाऊ रक्कम: ₹९०,०००/- प्रति व्यक्ती
उर्वरित रक्कम ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी भरणे आवश्यक आहे.

प्रवास खर्चामध्ये समाविष्ट:

  1. ​फ्लाईट तिकिट्स, सियाम रीपमधील ५ स्टार हॉटेलमधील निवास, ट्विन शेअरिंग रूम

  2. हवाई प्रवास वगळता शुद्ध  भारतीय नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण

  3. ब्रॉशरमध्ये नमूद केलेल्या सर्व पर्यटन स्थळे आणि मंदिर भेटी प्रवेश शुल्कासह

  4. अप्सरा नृत्य, टोनले सॅप, नॅशनल म्युझियमचे शुल्क समाविष्ट

  5. प्रत्येकाला ट्रॅव्हल सिम कार्ड कॉलिंग + डेटा सुविधा

  6. ई-व्हिसा

  7. ट्रॅव्हल इन्शुरन्स

  8. ड्रायव्हर, सहाय्यक इत्यादींना देण्यात येणारी टिप्स

  9. गाइडचे मानधन

प्रवास खर्चामध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी:

  1. ​वैयक्तिक खर्च जसे की खरेदी, वैद्यकीय खर्च आणि इतर खर्चे

  2. भोजनाच्या वेळेपलीकडील इतर सर्व प्रकारचे पेय व पॅकबंद पाणी

  3. ​विमान प्रवासादरम्यान ले-ओव्हरमध्ये होणारे खानपान व इतर खर्चे

  4. वरील यादीत नमूद न केलेले इतर कोणतेही खर्च

  5. एका व्यक्तीकडून पूर्ण खोली घेतल्यास अतिरिक्त शुल्क : रु. २१,०००/- किंवा USD ३०० (५ दिवसांसाठी)

  6. अतिरिक्त एक दिवस राहण्यासाठी : एका दिवसाचे अतिरिक्त निवास – रु. ९,०००/- किंवा USD १०० (२ व्यक्तींसाठी प्रति दिवस)

Cancellation Policy
Amount
Minimum Charges :
₹35,000/- + Airfare
Cancellation 40 days before departure :
₹50,000/- + Airfare
Cancellation 20 days before departure :
₹60,000/- + Airfare
Cancellation between 0–20 days before departure :
₹1,40,000/-

सूचना आणि माहिती :

  • कंबोडियातील बहुतांश मंदिरांमध्ये जास्त पायी चालावे लागत नाही, परंतु अंगकोरवाट विष्णुधाम मंदिरात तुम्हाला साधारण ३ ते ४ तासांत एकूण जाऊन येऊन ३ किमी पायी चालावे लागेल.

  • ता प्रोम येथे तुम्हाला साधारण २ तासांत १.५ किमी ते २ किमी इतके पायी चालावे लागेल.

  • व्हीलचेअर सेवा अतिरिक्त खर्चावर उपलब्ध आहे – $२५ USD प्रति व्हीलचेअर प्रति दिवस. व्हीलचेअरसाठी सहाय्यक हवा असल्यास अतिरिक्त $२५ USD प्रति दिवस शुल्क लागू होईल.

  • कंबोडियामध्ये ज्या विमानतळावर तुम्ही उतरणार आहात त्याचे नाव सियाम रीप (SAI) आहे.

  • हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तुम्हाला एक स्थानिक सिम कार्ड दिले जाईल. यामुळे संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सर्वांशी जोडलेले राहाल. तुमचे नातेवाईक कधीही तुम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करू शकतील. तुम्ही नेहमी ग्रुप  आणि टूर लीडरशी जोडलेले राहाल.

  • आमचे स्वयंसेवक दुसऱ्या दिवशी सियाम रीप विमानतळावर तुमचे स्वागत करतील. त्यांचे संपर्क क्रमांक तुमच्याकडे आधीपासून असतील. तुम्ही विमानतळाच्या आतून त्यांना फोन करू शकता.

  • काही अपरिहार्य कारणास्तव प्रवास कार्यक्रमात बदल होऊ शकतो.

  • न्यायक्षेत्र मर्यादा – कोणत्याही कायदेशीर तक्रारीसाठी न्यायक्षेत्र मर्यादा पुणे शहर न्यायालयापुरती राहील.

भारताबाहेरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना:

  • तुम्ही या टुरसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता.

  • परदेशांमधून येणारे प्रवासी PayPal द्वारे पैसे जमा करू शकतात.

  • तुम्हाला २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत किंवा त्याआधी सिम रीप (SAI) विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. परतीचे तिकीट २९ ऑक्टोबर, उपलब्धतेनुसार आणि तुमच्या सोयीप्रमाणे बुक करावे.

  • तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या देशातून ई-व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. ही सोपी आणि ऑनलाइन प्रक्रिया आहे. साधारणपणे ३ ते ४ दिवसांत व्हिसा जारी केला जातो.

पुणे कार्यालय : इंडिया कंबोडिया अंगकोर फाउंडेशन
६२२, जानकी रघुनाथ, पुलाचीवाडी, डेक्कन जिमखाना, पुणे – ४११००४
📱 संपर्क : वेदांत कुलकर्णी – ७०६६२५०३६२

डोंबिवली कार्यालय : इंडिया कंबोडिया अंगकोर फाउंडेशन द्वारा प्रोफिशिएंसी पॉइंट अकॅडमी एलएलपी
इन्फिनिटी बिझनेस पार्क, दुसरा मजला, शॉप नं. २०७, प्लॉट नं. A-११५/१, देव लॉजजवळ, एम.आय.डी.सी., डोंबिवली
📱 संपर्क : वीरेंद्र देवस्थळी – ९८२१४०३८३८

बोरीवली कार्यालय : इंडिया कंबोडिया अंगकोर फाउंडेशन
७०२, ओरायन रेसिडेन्सी, लोटस हॉस्पिटल समोर, प्रेरणा नगर, भाभाई, बोरीवली पश्चिम - ४०००९२
📱 संपर्क : डॉ. नरेंद्र जोशी – ९८३३५७१८९३ / ९८२०७१८०२२

  • आमच्याविषयी

  • आमचे उपक्रम
  • हेरिटेज यात्रा

  • सदस्यत्व

  • संपर्क

India Cambodia Angkor Foundation

इंडिया कंबोडिया अंगकोर फाउंडेशन

दोन हजार वर्षांच्या संस्कृती, परंपरा आणि सभ्यतांचे पुनरुज्जीवन

+91 7066250362

६२२, जानकी रघुनाथ, पुलाचीवाडी,
डेक्कन जिमखाना, पुणे – ४११००४

© २०२६ इंडिया कंबोडिया अंगकोर फाउंडेशन. सर्व हक्क राखीव.

bottom of page